Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिंदे फडणवीस सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या आदिवासी विरोधातील निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागणार : ॲड.के.सी.पाडवी

team by team
December 1, 2022
in राजकीय
0
शिंदे फडणवीस सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या आदिवासी विरोधातील निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागणार : ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार | प्रतिनिधी

 

उनूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे तीन हजार ८९८ कर्मचार्‍यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आल्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतला. या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागणार असून आदिवासी विकासमंत्री यांच्या उपस्थितीत आदिवासी विरोधात हा निर्णय झाला. आदिवासी विकासमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अथवा शासनाचा निषेध करावा. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा ईशारा माजी आदिवासीमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

 

 

नंदुरबार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुढे ऍड.पाडवी म्हणाले की, दि.६ जुलै २०१७ रोजी गेल्या अनेक वर्षांपासून लढत असलेल्या दावाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत बनावट जात प्रमाणपत्राचा आधारे नोकर्‍यांना लागलेल्यांना नोकरीवरून काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून वसुली करण्याचे आदेश दिले होते. मात्र असे असतांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांना त्यांनी माजीमंत्री विष्णू सावरा यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अशी कुठलीही कमिटी नेमता येत नाही.

 

 

 

अशी चूक आघाडी सरकारने केली. त्यात माजीमंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंढे, ऍड.के.सी.पाडवी आदी सदस्यांचा सहभाग होता. मात्र या कमिटीला विरोध करत मी आठ पाणीपत्र दिले होते. असे ऍड.पाडवी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मानवतावादी दृष्टीकोणातून अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचार्‍यांना सेवा विषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बोगस आदिवासी प्रमाणपत्राचा आधारे असलेल्यांना न्यायालयाचा आदेशानुसार आदिवासींच्या जागेवरून हटवावे व आदिवासींसाठी असलेल्या १२ हजार ५०० रिक्त जागांची भर्ती करावी.

 

 

 

मी मंत्री असतांना कमिटीला विरोध केला. मात्र दि.२९ नोव्हेंबर रोजी कॅबिनेटच्या बैठकीत आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत असतांना आदिवासींच्या विरोधात निर्णय घेण्यात आला. याबाबत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अथवा सरकारच्या विरोधात निषेध करावा. न्यायालयाच्या आदेशाचे अंमलबजावणी करणे सरकारचे कर्तव्य आहे. अदिसंख्य पदावर भर्ती करण्याचा निर्णय त्यांनी रद्द करत त्यांना दुसरीकडे कुठेही सामावून घ्यावे.

 

 

 

राज्य शासनाचा या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असून आदिवासीं विरोधात निर्णय घेणार्‍या सरकार विरोधात नागरीक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा माजीमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी दिला. यावेळी पत्रकार परिषदेला माजीमंत्री ऍड.पद्माकर वळवी, दिलीप नाईक आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात दोन जण जागीच ठार

Next Post

ॲड.के.सी.पाडवी यांच्या उलट्या बोंबा : आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित

Next Post
ॲड.के.सी.पाडवी यांच्या उलट्या बोंबा : आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित

ॲड.के.सी.पाडवी यांच्या उलट्या बोंबा : आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add