Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक

team by team
September 6, 2021
in राज्य
0
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक

नंदुरबार | प्रतिनिधी

देवास (म.प्र.) येथे झालेल्या ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मध्यप्रदेश संघाला नमवून सुवर्ण पदकावर नाव कोरले. या विजयी महाराष्ट्र संघात नंदुरबार जिल्ह्यातील आठ खेळाडूंचा समावेश होता.
टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व मध्यप्रदेश टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट वरिष्ठ गट स्पर्धेचे आयोजन दि.२ ते ४ सप्टेंबर २०२१ दरम्यान कुशाभाऊ ठाकरे स्टेडियम देवास (मध्यप्रदेश) येथे करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण १४ राज्यांनी सहभाग नोंदवला. यात महाराष्ट्र संघाने तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब, विदर्भ आणि अंतिम सामन्यात मध्यप्रदेश संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या विजयी संघात उंपात्यपूर्व सामन्यात संदीप वसावे, उपांत्य सामन्यात दिनेश सोनवणे तर  अंतिम सामन्यात सुनील गावित या खेळाडूंनी हॅट्रिक विकेट घेऊन विजय मिळूवन दिला. श्रावण गावीत या खेळाडूने उत्कृष्ट खेळी करत मालिकावीर किताब मिळवला तर उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून दिनेश सोनवणे तर उत्कृष्ठ फलंदाज म्हणून फिलिप वळवी याची निवड करण्यात आली. या विजयी संघात कर्णधार दिनेश भिल, मुनिल गावीत, श्रावण गावीत, फिलिप वळवी, गणेश देशमुख, सुमित कुवर, संदीप वसावे, संदीप गावीत, सुनिल गावीत, कल्पेश चौरे, विनोद सूर्यवंशी, दिनेश सोनवणे, आकाश बागुल यांचा समावेश होता. या विजयी संघास जगदीश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गौरव दीक्षित, उपाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, सचिव जगदीश वंजारी, कार्याध्यक्ष संजय होळकर, प्रताप पगार, डॉ.मयुर ठाकरे, अनिल सहारे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले. विजयी संघास स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव अलोक खरे, देवास शहराचे युवराज विक्रमसिंह पवार, सॉफ्ट टेनिसचे महासचिव संदेश कांगटे, टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव विशाल सिंग, मध्यप्रदेश टेनिस क्रिकेट असो.च्या सचिव ललिता चव्हाण, रणजी खेळाडू राकेश आझाद यांच्या हस्ते चषक, पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी परिसरात अमोप शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

Next Post

तायक्वांदो परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप

Next Post
तायक्वांदो परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप

तायक्वांदो परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add