नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील चिखलीचा नेवडापाडा येथे शेतातून ज्वारीचा कडबा घरी का आणला या कारणावरुन सख्ख्या भावाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करुन दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील चिखलीचा नेवडापाडा येथील पिंजारी बालज्या पावरा यांनी त्यांचे भाऊ गज्या बालज्या पावरा यांच्या शेतातून ज्वारीचा कडबा घरी आणला.
या कारणावरुन पिंजारी पावरा यांच्या डोक्यावर गज्या पावरा याने कुऱ्हाडीने वार करुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पिंजारी पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात गज्या पावरा याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.कालूसिंग पाडवी करीत आहेत.








