नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील गांधी नगर परिसरातील मेडीकल दुकान फोडून १५ हजार रुपये लांबविल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील गांधी नगर परिसरातील महेश कोमलसिंग गिरासे यांचे आरती मेडीकलचे दुकान आहे. सदर मेडीकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन दगडूबा मुकूंद बोरडे रा.पेरजपूर ता.भोकरदन जि.जालना आत प्रवेश केला.
यावेळी मेडीकलमधील १५ हजार रुपये रोख चोरुन नेले. याबाबत महेश गिरासे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात संशयित दगडूबा बोरडे याच्याविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोना.अमोल जाधव करीत आहेत.








