नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत एस.ए.मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी विजयी झाले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धेमध्ये १४ वर्ष वयोगतील मुलं-मुली तसेच १७ वर्ष वयोगट मुलांमध्ये एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विजय झाला असून १७ वर्ष वयोगटात अंतिम सामन्यात ही. गो. श्रॉफ हायस्कूल ला 6-0 ने नमवले, ह्या सामन्यात पदमेश वसावे याने 1 गोल, ईश्वर रामोळे याने 3 तर ईश्वर वसावे या खेळाडुने 2 गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला,तर १४ वर्ष वयोगटात,ही.गो.श्रॉफ हायस्कुल समोर योगेश पावरा ह्या खेळाडू ने 1 गोल नोंदवत एस.ए.मिशन संघाला विजय मिळवून दिला.
तर १४ मुलींमध्ये सुद्धा संघाने यश मिळवले हे सर्व विजयी झालेले संघ पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील सर्व विजयी संघातील खेळाडुंचे कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी,चेअरमन रेव्ह.जे.एच.पठारे, शाळेच्या प्राचार्य सौ. नुतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी यांनी अभिनंदन केले तर क्रीडा शिक्षक सतिष सदाराव , सौ.शारदा पाटील ,खुशाल शर्मा यांनी परिश्रम घेतले.








