नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील मोगराणी हरणीपाडा गावादरम्यान 800 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. सदर कामासाठी खडी घेऊन जाणारा डंपर ( क्र. एम.एच.39, ए.सी.) मोगराणी व हरणीपाडा रस्त्यावर बांधलेल्या फरशी पूलावरून जात असताना अचानक मागचे टायर फरशीला खड्डा पडून ट्रकचा अपघात झाला.

सदर अपघात फरशी पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा उत्तम उदाहरण देत आहे. या फरशी पूला खाली माती आहे. कोणत्याही प्रकारच्या लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात आलेला नाही.
बांधकाम विभाग व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्याचे व फरशी पूलांच्या कामांचा दर्जा न तपासताच ठेकेदाराला बिले मंजूर केली जात असल्यामुळे अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करून ठेकेदार मलिदा खाऊन नागरिकांचा जीव धोक्यात टाकत आहे. सदर फरशी पूलाचे काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराबाबत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.








