Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे नंदूरबारला सापडली 1 अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे, एकास अटक

team by team
November 29, 2022
in क्राईम
0
अरे बापरे नंदूरबारला सापडली 1 अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे, एकास अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने 1 अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास अटक करण्यात आली आहे.

 

गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून गुजरात राज्याला लागुन असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयात देखील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्हयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी काही दिवसांपुर्वी नंदुरबार जिल्ह्यास भेट दिली होती.

 

त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अवैध दारु वाहतुक, बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी यावर कठोर कारवाई करण्याचे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना निर्देश दिले होते.

 

 

नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी देखील अवैध दारु वाहतुक, बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी यावर कठोर कारवाई करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. तसेच नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक हे देखील स्वतः सर्व गोष्टीवर देखरेख ठेवून जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन करीत होते.

 

२८ नोव्हेंबर रोजी रात्री नंदुरबार शहरात मच्छी बाजारात एका इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्टल असून तो ते विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी नंदुरबार विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कारवाई करण्याचे सुचना दिल्या.

 

 

नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तातडीने नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोउनि सागर आहेर यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ अतुल बिन्हाडे, पोहेकॉ जगदिश पवार, पोना भटु धनगर, पोना बलवींद्र ईशी, पोना स्वप्निल शिरसाठ, पोशि अफसर शहा, पोशि अनिल बडे, पोशि विजय नागोडे यांची दोन पथके तयार केली. सदर पथकांनी मच्छी बाजार परिसरात सापळा रचला असता मच्छी बाजाराजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयाशेजारी असलेल्या मोकळया मैदानातील पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा संशयितरीत्या फिरत असतांना दिसून आला.

 

 

पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जावू लागला. त्यामुळे पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करुन पांडुरंग बाबुराव प्रजापती, रा. अहिल्याबाई विहीरीजवळ, कुंभारवाडा, नंदुरबार यास अटक केली.तसेच तो वांरवार त्याचे कमरेला हात लावत असल्याचे दिसून आल्याने पोलीसांनी लागलीच दोन पंचाना बोलावून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 20 हजार रपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल व दोन पिवळया धातुचे जिवंत काडतुसे मिळुन आले.

 

सदरच्या वस्तू पोलीसांनी कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या. तसेच त्यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 सह महा. पो. का. कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा नंदुरबार जिल्हा पोलीसांकडुन इशारा दिलेला आहे.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोउनि सागर आहेर, पोहेकॉ अतुल बिऱ्हाडे, पोहेकॉ जगदिश पवार, पोना भटु धनगर, पोना बलविंद्र ईशी, पोना स्वप्निल शिरसाठ, पोशि अनिल बडे, पोशि विजय नागोडे, पोशि अफसर शहा यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात एकास फायटरने मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

सोमवारी 5 डिसेंबरला होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Next Post
सोमवारी 5 डिसेंबरला होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

सोमवारी 5 डिसेंबरला होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add