नंदुरबार l प्रतिनिधी
व्हाईस ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत नंदुरबार जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी पत्रकार धनराज माळी व शहादा येथील पत्रकार हिरालाल रोकडे यांची तर सरचिटणीसपदी पत्रकार राकेश कलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तळोद्याचे पत्रकार ईश्वर मराठे व नवापूरचे प्रा.आय.जी.पठाण हे उपाध्यक्षपदी असतील.
व्हाईस ऑफ मिडीया ही संघटना 50 ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी स्थापन केली आहे. देशातील 17 राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत असून राज्यातील सुमारे 22 जिल्ह्यांत संघटनेचे कार्य सुरु आहे. कोरोना काळात 136 पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संघटनेने 136 पत्रकाराच्या 150 पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. पत्रकारिता व पत्रकार यांच्या हितासाठी या संघटनेचे कार्य सुरु आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, महाराष्ट्र राज्याध्यक्ष राजा माने, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा संपर्कप्रमुख नरेश हाळनोर यांनी नंदुरबार जिल्ह्यातही पत्रकारिता आणि पत्रकारांच्या हिताचे काम करण्यासाठी व्हाईस ऑफ मिडीया या संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र दोरकर यांच्यावर सोपविली आहे. जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांच्या नेतृत्वाखाली व्हाईस ऑफ मिडीयाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. यात जिल्हा कार्याध्यक्षपदी पत्रकार धनराज माळी, पत्रकार हिरालाल रोकडे, जिल्हा सरचिटणीसपदी पत्रकार राकेश कलाल, उपाध्यक्षपदी पत्रकार ईश्वर मराठे,
मुक्त पत्रकार प्रा.आय.जी.पठाण, खजिनदार तथा कोषाध्यक्षपदी पत्रकार विनय जैन, जिल्हा सहसरचिटणीसपदी कमलेश पटेल, कार्यवाहकपदी राजाराम पाटील, पेमेंद्र पाटील, संघटकपदी सचिन जळोदकर, अरुण मोरे, फुंदीलाल माळी, जिल्हा प्रवक्तापदी पत्रकार रविंद्र चव्हाण, प्रसिध्दीप्रमुखपदी जगदिश ठाकूर तर सदस्यपदी अकील पिंजारी, दै.तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी वैभव करवंदकर, हिरालाल मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांच्या हितासाठी सकारात्मक दृष्टीने व्हाईस ऑफ मिडीया ही पत्रकारांची संघटना काम करणार आहे. म्हणुन या संघटनेत काम करु ईच्छिणार्यांनी सहभागी होण्यासाठी व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हा कार्याध्यक्ष धनराज माळी, सरचिटणीस राकेश कलाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.








