शहादा l प्रतिनिधी
प्रहार शिक्षक संघटनेच्या शहादा तालुका उपाध्यक्षपदी सुनील चित्ते यांची निवड करण्यात आली.
अचिव्हर हाईट्स इंटरनॅशनल स्कुल येथे प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू व राज्याध्यक्ष विकास घुगे यांच्या आदेशानुसार प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत , जिल्हा कर्याध्यक्ष विश्वास देसाई , जिल्हा संघटक गणेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारिनी पदाधिकारी यांच्यातर्फे शहादा तालुका नूतन कार्यकारीणी घोषित करण्यात आली. प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन बच्चू भाऊंचे विचार तळागाळापर्यंत निश्चित पोहचिण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
आपल्या नियुक्तीने विश्वास करून शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांना न्याय मिळवून देण्याबाबत वेळोवेळी प्रयत्न करणार संघटनेची संघटन शक्ती अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिक शिक्षकांना आपल्या अधिनस्थ काम करण्याची संधी उपलब्ध द्यावी. अन्यायावर वार, न्यायासाठी प्रहार, शिक्षकाच्या हितासाठी शिक्षकाच्या वाडी, वस्ती, पाड्यातील समस्या सोडवण्यासाठी तसेच अखंड सक्षम वास्तव गेली अनेक वर्षे सातत्याने न दमता न थकता आवश्यक असेल तेथे सक्षम बसून पाठपुरावा केला जातो नेहमीच काम हाच कामाचा गुरु असतो प्रहार हे फक्त संघटन नसून सामाजिक बांधिलकी व शिक्षकाच्या आत्मसन्मानासाठी लढणारा परिवार आहे. असेही मत जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांना तसेच निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन या संविधानाचे औचित्य साधून प्रास्ताविकेचं वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी तुकाराम अलट यांच्या कामाचे कौतुक केले. शिक्षकांनी आपल्या प्रलंबित प्रश्न बाबत चर्चा केली.
त्याचबरोबर या सर्व प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडवण्यात येईल. अनेक शिक्षक आपले वेगवेगळे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी हजर होते त्या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे मांडून सोडविणार येणार याबाबत संघटनेमार्फत प्रयत्न करू असे जिल्हाअध्यक्ष गोपाल गावीत यांनी आश्वासन दिले. सारंगखेडा ता. शहादा येथील सुनिल चित्ते यांची नुकतीच नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या शहादा तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सुनिल शिवलाल चित्ते यांचे शिक्षण बी. ए. बी एससी. डी. एड झाले आहे.
एक उत्तम व सर्वगुण संपन्न आदर्श शिक्षक असून सध्या ते जिल्हा परिषद शाळा टेंभे त. सा. केंद्र सारंगखेडा येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.या अगोदर जळगाव जिल्हा येथे त्यांनी शिक्षक म्हणून उत्तम काम केले आहे. सारंगखेडा केंद्रातून चालू वर्षी त्यांना रयतेचा कैवारी आदर्श जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराने त्यांना पनवेल जि. रायगड येथे सन्मानित करण्यात आले आहे. सुनिल चित्ते हे विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने धडपडत असून शिक्षकांना न्याय मिळावा अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडतात. ते उत्तम लेखकही आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
शिक्षकांच्या स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य वाटप केलेले आहे. त्यांच्या निवडीबद्दल समस्त शिक्षक बांधवांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना शहादा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये अत्यंत झपाट्याने व उत्कृष्ट असे मजबूत संघटन बांधत आहे. यासोबतच शिक्षकांच्या जिव्हाळ्याची प्रश्नही यशस्वीपणे हाताळत आहे. शहादा तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे हे सकारात्मक कार्य शिक्षकांना प्रचंड प्रमाणात आकर्षित करणारे व शिक्षकाचे हित जपणारे असल्यामुळे ते अत्यंत जोमाने व वेगाने करण्यात येईल असा विश्वास संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांनी व्यक्त केला आहे. सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांच्या अविरत कष्टातून अत्यंत वेगाने नंदुरबार जिल्ह्यातील अभ्यासू नामवंत व निष्ठावंत शिक्षकांचे बांधलेले संघटन व शिक्षकांच्या समस्या यशस्वीपणे हाताळण्याची हातोटी शिक्षक बांधवांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे .
प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेला शिक्षक जगतातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने तालुक्यातही प्रत्येक केंद्रातून किमान पाच शिक्षकांना प्रहार संघटनेत समाविष्ट करून घेण्याचा मानस संघटनेचे नूतन तालुका उपाध्यक्ष सुनिल चित्ते यांनी व्यक्त केला आहे . यामुळे प्रहार शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडता येणे सहज शक्य होणार असून प्रत्येक प्रशन शिक्षकांची समाधान होईल अशा पद्धतीने सोडवता येणार आहे.
नूतन कार्यकरिणी शहादा तालुका उपाध्यक्ष – श्री सुनिल चित्ते सारंगखेडा, तालुका संघटक-राकेश पाडवी कलमाडी, केंद्र संघटक आमिर सय्यद (शिरुड दिगर), केंद्र संघटक संदिप राकडे (सारंगखेडा), सहप्रसिद्धीप्रमुख -इरेशा आजुरे, सहसचिव महेंद्र मोहिते (सारंगखेडा) पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मुकनर यांनी केले तर प्रस्ताविक शंकर मेंडके यांनी केले. दयानंद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रहारच्या कामाने प्रभावित होऊन अनेक शिक्षकांनी प्रहार शिक्षक संघटनेमध्ये प्रवेश केला. तालुका अध्यक्ष तुकाराम अलट यांनी संघटनेच्या कार्याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले व उपस्थितांचे आभार मानले.








