नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील धुळे नाका परिसरात आपसात भांडण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील धुळे नाका परिसरात युवराज उत्तम कुंभार, सागर संतोष कुंभार, आनंद मोहन कुंभार व मयूर अर्जुन कुंभार हे चौघे जण शांततेचा भंग करुन आपासात भांडण करतांना आढळून आले.
याबाबत पोशि.उमेश वारे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.अमोल जाधव करीत आहेत.