नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बाबा गरीबदास चौकात शिवीगाळ करु नका, असे सांगितल्याचा राग आल्याने एकावर चाकूने वार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी येथील सचिन दीपककुमार मंदाणा (वय २१) याने जय उर्फ हुम्मा गागनदास राजपाल याला शिवीगाळ करु नका असे सांगितले. याचा राग आल्याने सचिन मंदाणा यांना जय उर्फ हुम्मा गागनदास राजपाल याने हातातील चाकूने वार केला असता तो वार सचिन मंदाणा यांनी चुकविला. तुषार सोनुकुमार मंदाणा याने लोखंडी रॉडने पाठीवर मारुन दुखापत केली. बंटी रोहिदास पाडवी याने काठीने मारहाण केली.
तसेच चौघांनी संगनमत करुन हाताबुक्यांनी मरहाण करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सचिन मंदाणा यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.