नंदुरबार l प्रतिनिधी
जनशक्ती मंत्रालय भारत सरकार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद नंदुरबार व नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथ गावडे ,मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार,सुनील बाविस्कर कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद नंदुरबार उपस्थित होते.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी रंगनाथ गावडे म्हणाले की, करताना म्हटले कि,पाणी मूलभूत गरज आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध नसले तर त्याचा गावकरी व कुटुंबियांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होतो. कुटुंबातील महिला व मुलींना नाईलाजास्तव दुरदुरुन पाणी आणण्याकरीता त्रास सहन करावा लागतो. या सर्व त्रासातून मूक्ती व्हावी या उद्देशाने शासनाने जल जीवन मिशनची सुरवात केली आहे.. यामध्ये प्रत्येक कुटुंबास पुरेसे शुध्द पाणी प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जल जीवन मिशन राज्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. पण, गावागावांत जल जीवन मिशन यशस्वीपणे राबविण्यात ग्रामपंचायत व गावकऱ्यांची मोठी जबाबदारी आहे. जल जीवन मिशन ही लोकांची योजना आहे.ग्रामस्थांनी जल जीवन मिशन योजना राबविणे, चालविणे, देखभाल दुरुस्तीकरीता पुढाकार घ्यायचा आहे.
गावातील योजनेबाबत आपलेपणाची व मालकीचा भावना निर्माण व्हावी याकरिता जल जीवन मिशनमध्ये लोकवर्गणीची तरतूद ठेवण्यात आली आहे. या लोकवर्गणीची रक्कम आर्थिक किंवा श्रमदानाच्या स्वरुपात अदा करायची आहे. योजना पुर्ण झाल्यानंतर योजनेच्या देखभाल दुरुस्तीकरीता सदर निधीचा विनियोग आहे. कमी उत्पन्न स्त्रोत असणाऱ्या ग्रामपंचायतींना श्रमदानाच्या स्वरुपात लोकवर्गणी अदा करण्याची आहे.
गावागावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य व त्यामुळे गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासातुन मूक्ती मिळविण्याकरीता जल जीवन मिशन ही सुवर्ण संधी आहे. ग्रामस्थांच्या पुढाकाराने जल जीवन मिशनअंतर्गत आदर्श योजना तयार व्हाव्यात.प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून या विषयावर प्रकाश टाकण्यात आला .
या प्रशिक्षणात नंदुरबार तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतील ५ सदस्यांना तर शहादा तालुक्यातील ७२ नवापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायत सहभाग घेतला असून इतर उर्वरित ग्र.प.देखील सदर प्रशिक्षण दिले जाणार आहे आलेल्या पाच सदस्यांना क्षमतावृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम विविध प्रशिक्षकांच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन, पाण्याचा स्रोत प्रकटीकरण, जलजीवन मिशनची संकल्पना, पारंपरिक पिण्याच्या पाण्याची पुरवठा नळ कनेक्शन, त्याचे फायदे, परिणाम, जलजीवन मिशन अंतर्गत मिळणाऱ्या वेगवेगळ्या संधी, ग्रामपंचायतीची भूमिका जबाबदान्या सरपंच, पाणी समिती सदस्य आणि पद्धतीने सहभागी नकाशा, जल जीवन मिशन व पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची भूमिका पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण व स्त्रोतांच्या प्रभावी व्यवस्थापन,पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम, देखरेख, बहिर्गमन प्रक्रिया,आणि दर्जेदार बांधकामाकरिता कृती,पाणी पुरवठा योजनेचे संचालन, देखभाल व दुरुस्ती आणि सुयोग्य व्यवस्थापन,पाणी गुणवत्ता व्यवस्थापन व सर्वेक्षण आणि सुरक्षित पाणी पुरवठा,गावस्तरीय नियोजन प्रक्रिया व साधने,नैसर्गिक संसाधन,स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे अंदाजपत्रक, गावातील पाणीपुरवठा सेवा सुविधा, प्रत्येक माणसाला ५५ लीटर पाणी नळाद्वारे मिळावे म्हणून त्याच्या योजना जलजीवन मिशनच्या माध्यमातून करावयाच्या आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी यशदा प्रशिक्षित प्रशिक्षक निता पाटील , रवी गोसावी ,राजेश ईशी ,सीमा पाडवी .अनिल वळवी , प्राचार्य डॉ.एच.एम. पाटील, जिल्हा परिषदेचे पाणी गुणवत्ता पांडुरंग दरवार दिनेश पाटील ,सुरेश महाले ,जगदीश राजपूत आदिने मार्गदर्शन केले .कार्यकम यशस्वी होण्यासाठी नवनिर्माण संस्थेचे संजय वळवी ,भूषण साळुखे ,अनिल वसावे ,रोहिणी गावित ,मोहिनी गावित ,अश्विनी गोसावी ,पूनम पवार आदींनी परिश्रम घेतले .