नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
तालुक्यात 16 ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रिया 28 नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची सुरुवात झाली असून ग्रामपंचायत यात खेकडा, वाटवी, खडकी, शेही विसरवाडी , गंगापूर ,भांगरपाडा शेगवे नानगीपाडा, व-हाडीपाडा, करंजीवेल, वाटवी, पाटी ,बेडकी ,वावडी ,अंठिपाडा या गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सकाळी 11 वाजेपासून सुरुवात झाली आहे. निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून आठ कर्मचारी नियुक्ती करण्यात आले असून व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहे.असे एकूण 16 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
परिवेक्षक म्हणून तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी सुरेखा जगताप यांची यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे का निजाम पाडवी ,विनोद पराडके यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.
या प्रसंगी नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ सकाळी ११ ते ३ वाजे पर्यत असुन आज पहिल्या दिवशी करंजवेल वार्ड क्र ३ अ.ज.स्ञी राखीव जागेवर १ अर्ज,अंठीपाडा सरपंच पदसाठी १ अर्ज,खेकडा गावाचा सरपंचपदासाठी १ व सदस्य पदासाठी १,करंजवेल येथे सरपंचपदासाठी १,नानगीपाडा येथील सरपंच पदासाठी १, व-हाडीपाडा सदस्य पदासाठी १ असे ७ अर्ज पहिल्या दिवशी प्राप्त झाले आहे.