नंदूरबार l प्रतिनिधी
येथील जी. टी.पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना दिवस निमित्त राष्ट्रीय छात्र सेना विभाग, 49 महाराष्ट्र बटालियन, लायन्स क्लब नंदुरबार व जनकल्याण रक्तपेढी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिर महाविद्यालयाच्या प्रांगणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करून राबवण्यात आले. उद्घाटन प्रसंगी उपप्राचार्य प्रा. निलेश सोमानी, लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश चौधरी, सचिव उद्धव तांबोळी, कोषाध्यक्ष शंकर रंगलानी, जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अर्जुन लालचंदानी उपस्थित होते.
रक्तदान हैं जीवनदान हा मानवतेचा संदेश घेऊन सर्व विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरुवातीला रक्तदानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयातील छात्रसैनिक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व इतर विद्यार्थी असे एकूण जवळजवळ 30 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले 49 महाराष्ट्र बटालियन तर्फे हवलदार राजेश कुमार व हवालदार पंत यांची उपस्थिती लाभली त्यांनी सुद्धा छात्रसैनिकांना रक्तदानाविषयी मार्गदर्शन केले. एनसीसी डे निमित्त रक्तदान शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय छात्र सेनाचे महत्व पावून देण्यात आले तसेच एकता औंर अनुशासनची प्रचिती दिली.
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी एनसीसी अधिकारी लेफ्ट. विजय चौधरी, कॅप्टन. राहुल पाटील, सीटीओ. राजेंद्र आंधळे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. माधव कदम, एन.एस. एस. अधिकारी डॉ दिनेश देवरे ,डॉ उपेंद्र धगधगे, डॉ मनोज शेवाळे व व क्रीडा अधिकारी डॉ तारक दास यांचे अनमोल सहकार्य लाभले.