Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस दलाचे कोंबिंग ऑपरेशन : पावणे दोन कोटीची अवैध दारू जप्त, गुजरात राज्यातील २१ फरार आरोपींना अटक

team by team
November 29, 2022
in क्राईम
0
पोलीस दलाचे कोंबिंग ऑपरेशन : पावणे दोन कोटीची अवैध दारू जप्त, गुजरात राज्यातील २१ फरार आरोपींना अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

 

गुजरात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून 1 कोटी 65 लाखाची अवैध दारु जप्त करण्यात आली असून गुजरात राज्यातील फरार २१ आरोपींना अटक करून गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

गुजरात राज्यात 1 व 5 डिसेंबर 2022 रोजी विधानसभेच्या 182 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. जस जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे तस तसा गुजरात व महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून महाराष्ट्रातून गुजरात राज्यात अवैधरीत्या दारुची वाहतूक करणाऱ्या तसेच गुजरात राज्यात गुन्हे करून महाराष्ट्रात वास्तव्यास असणाऱ्या फरार आरोपींविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने धडक मोहिम हाती घेतली आहे.

 

 

गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असते. त्याविषयीच्या तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, विसरवाडी, मोलगी व उपनगर या पोलीस ठाणे हद्दीला गुजरात राज्याचे लागून असलेल्या तापी, नर्मदा डांग व छोटा उदेपूर या चार जिल्ह्यात येत्या काळात विधानसभेची निवडणूक असल्याने महाराष्ट्रातून गुजरात राज्यात अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी संबंधीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना नाकाबंदी करुन अवैधरीत्या दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमांवर व वाहनांवर कारवाई करण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या.

 

 

त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या 17 ठिकाणी आंतरराज्य नाकाबंदी लावलेली असून त्याठिकाणी 14 पोलीस अधिकारी व 144 पोलीस अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत. नाकाबंदीच्या ठिकाणी अधिकारी व अंमलदार यांचे पथक 24 तास कार्यान्वीत असून गुजरात राज्यात
जाणाऱ्या वाहनांची त्यांच्याकडून कडक तपासणी करण्यात येत आहे. अवैध दारुची सर्वाधीक वाहतूक होत असलेल्या नवापूर तालुक्यातील अवैध व्यवसायीकांनी आपल्याकडील दारुचा मुद्देमाल जंगलात लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अशा ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे.

 

 

३ ते 27 नोव्हेंबर पर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाणे हद्दीत छापा कारवाई करुन तब्बल दारुबंदीचे 226 गुन्हे दाखल करण्यात आले, त्यात गुजरात राज्यात जाणारी सुमारे 1 कोटी 65 लाख 84 हजार 691 रुपये किमतीची देशी विदेशी दारु व वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली आहे.

 

 

27 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.30 वा. सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत शहादा-धडगांव रस्त्यावर MSEB सबस्टेशन जवळ एका मागून एक असे तीन पिकअप वाहन येतांना दिसले म्हणून, पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी हातातील टॉर्चच्या सहायाने वाहन थांबविण्याचा इशारा दिला, परंतु तीन्ही वाहन चालकांनी वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेले म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन्ही वाहनांचा पाठलाग करुन थांबवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन्ही वाहनाची पाहणी केली असता त्यात 44 लाख 75 हजार 520 रुपये किमतीची विदेशी दारु, 18 लाख रुपये किमतीचे दारुची अवैध वाहतूक करणारे तीन वाहने व 21 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करुन म्हसावद पोलीस ठाणे येथे तिन्ही वाहनावरील वाहन चालक भरोसा, खिमा, तेरसिंग यांच्याविरुध्द् महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

 

तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील शेलकुवी गावात रस्त्याच्या बाजूला एका आंब्याच्या झाडाखाली 1 लाख 05 हजार 120 रुपये किमतीची रॉयल ब्ल्यू व्हिस्की व 24 Power Super Strong Beer मिळून आल्याने धडगांव पोलीस ठाणे येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

दुसऱ्या एका घटनेत नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कडकोट येथून गुजरात राज्यात खेकडा रोडवर करंजी गावाजवळ 1 लाख 17 हजार 600 रुपये किमतीची अवैध देशी दारु टँगो पंच दारु व 6 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी अटींगा वाहन ( क्र. GJ-03 AJ-1510) असा एकुण 7 लाख 17 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन वाहन (क्र. GJ-03 AJ-1510) हिच्यावरील वाहन चालक बाबा पुर्ण नाव माहित नाही रा. करंजी खु. ता. नवापूर याच्याविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

धडगांव पोलीस ठाणे हद्दीत बोरीचा कारभारीपाडा येथील निलेश रायसिंग पावरा हा विना परवाना विदेशी दारु कब्जात बाळगून तिची चोरटी विक्री करतांना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून 4 लाख 20 हजार रुपये किमतीची रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की जप्त करुन त्याच्याविरुद् धडगांव पोलीस ठाणे येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने शहादा पोलीस ठाणे हद्दीत शहादा-धडगांव दराफाटा रस्त्यावर पथकातील अंमलदारांना शहादा शहराकडून धडगांव गावाच्या दिशेने एक बोलेरो वाहन येतांना दिसले म्हणून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी हातातील टॉर्चच्या सहायाने वाहन थांबविण्याचा इशारा दिला, परंतु सदर वाहन चालकाने वाहन न थांबविता वाहन चालकाने त्याच्या वाहनाने शहादा पोलीस ठाण्याच्या शासकीय वाहनास धडक दिली. त्यानंतर वाहन चालक व त्यासोबतचा एक अज्ञात इसम असे वाहन सोडून पळून गेले. शहादा पोलीसांनी सदर वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये 19 लाख 80 हजार रुपये किमतीची विदेशी दारु मिळून आल्याने वाहन चालकाविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे दारुबंदी अधिनियम व जिवेठार मारण्याचा प्रयत्न करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

दि. 26 नोव्हेंबर रोजी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार असे रात्रगस्त करीत असतांना शहादा शहरात धिरज गणपत कोळी रा. कुकडेल ता. शहादा हा त्याच्या ताब्यात 25 हजार रुपये किमतीचे विना परवाना गावठी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगतांना मिळून आला म्हणून त्याचेविरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

निवडणूकीच्या अनुषंगाने अधिकृत एफ एल 1 व एफ एल 2 विक्रेत्याच्या दुकानाजवळ एकुण 16 ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहे. तसेच जिल्हा घटकातील अधिकृत एफ एल 1 व एफ एल 2 दुकानदार विक्रेत्यांना सी.आर.पी.सी. 149 प्रमाणे नोटीसा देण्यात आल्या आहेत. जिल्हा भरातील देशी विदेशी दारुचे गोडावून व वाईन शॉप विशेषतः नवापूर शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोबत घेवून एफ एल 1 व एफ एल 2 अधिकृत परवानाधारक यांचे गोडावून व वाईन शॉपमधील दारुसाठा तपासणी करण्यात आला आहे. त्यापैकी एक गोडावून सिल करण्यात आले आहे.

 

 

 

तसेच गुजरात राज्यात गुन्हे करुन नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात वास्तव्यास असणाऱ्या 95 फरार आरोपींची यादी गुजरात पोलीस प्रशासनाकडून नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनास प्राप्त झाली होती. मागील दिवसाच्या काळात नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने धडक कारवाई करीत विविध गुन्ह्यात फरार असलेल्या 10 तर गुजरात राज्यातील न्यायालयांकडून अटक वॉरंट जारी केलेल्या 11 अशा एकुण 21 आरोपींना जेरबंद करून गुजरात राज्यातील संबंधीत पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या पंकज नामदेव सोनवणे रा. भगतवाडी नवापूर जि. नंदुरबार या आरोपींविरुध्द् गुजरात राज्यात 10 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद असल्याचे आढळून आले आहे.

 

 

गुजरात विधानसभा निवडणूक अनुषंगाने महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सिमावर्ती भागात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 17 ठिकाणी आंतरराज्यीय नाकाबंदी लावण्यात आली आहे. गुजरात विधानसभा निवडणूक अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येणाऱ्या कारवाई तसेच उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी 25 नोव्हेंबर रोजी जिल्हाभर भेट दिली. अवैध दारु वाहतूक करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच उकळापाणी ता. नवापूर येथील आंतरराज्यीय नाकाबंदीच्या ठिकाणी भेट देवून मार्गदर्शन केले. तसेच नाकाबंदीचे ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सोयी सुविधांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. नवापूर पोलीस ठाणे येथे भेट देवून अधिकारी व अंमलदार यांना निवडणूक अनुषंगाने करावयाच्या कारवाईबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत.

 

 

गुजरात राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत व त्यानंतरही अवैध धंदे करणारे इसमांविरुध्द् कारवाई जारी राहील, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मालट्रकची दुचाकीला धडक ;पती-पत्नी जखमी

Next Post

जी.टी.पाटील महाविद्यालयात एन.सी.सी डे निमित्त रक्तदान शिबिर

Next Post
जी.टी.पाटील महाविद्यालयात एन.सी.सी डे निमित्त रक्तदान शिबिर

जी.टी.पाटील महाविद्यालयात एन.सी.सी डे निमित्त रक्तदान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add