म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद गावा नजीक मद्याची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली. गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची बेकायदेशीर होत असलेल्या वाहतुकीचा पर्दाफास यातून करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत मद्यसाठा, तसेच मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला एकूण तीन पिकअप बोलेरो असा ६२ लाख ९६ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांना कारवाईचे आदेश देण्यात आल्याने पोलिस पथकाने शहादा तालुक्यातील म्हसावद गावाजवळ सापळा रचून अवैध रित्या दारूची वाहतू करणारे वाहन थांबवुन तपासणी केली असता त्यात गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य आढळून आले घटना स्थळी वरून अंधाराचा फायदा घेत सदर आरोपीनी वाहन सोडून पोबारा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.