नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे काल गुरुवारी नंदुरबार दौर्यावर आले असता त्यांचे नंदुरबार शहर कुंभार समाजातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी कुंभार समाजाला व्यवसाय करतांना येणार्या अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी कुंभार समाजाच्या सर्व समस्या शासनस्तरावर सोडविण्याचे आश्वासन पदाधिकार्यांना दिले.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील हे नंदुरबार येथे आले असता कुंभार समाजातील पदाधिकार्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यानंतर कुंभार समाजाच्या अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली.
यावेळी उद्योगपती चंद्रशेखर (पुनमशेठ) कुंभार, जिल्हा कार्याध्यक्ष भगवान कुंभार, जिल्हा युवक अध्यक्ष दिनेश वाडीले, जिल्हा युवक कार्याध्यक्ष एकनाथ कुंभार, माजी नगरसेवक आनंद कुंभार, विट उत्पादक आघाडी अध्यक्ष रोहिदास कुंभार, विट उत्पादक राहुल कुंभार, भाऊ पेट्रोलपंपचे मालक दिपक वाडीले, तालुका अध्यक्ष शशिकांत कुंभार आदी उपस्थित होते.