नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा शहरात तीनशे फूट लांब तिरंगा रॅली काढून संविधान दिन साजरा करण्यात आला.
संविधान दिना निमित्त विविध सामाजीक संघटनांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातुन संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत तीनेश फुट लाबं भारतीय ध्वज तिरंग्याची रॅलीतून मिरवणुक काढण्यात आली होती.
हातात संविधानाच्या प्रती घेवुन नफरत छोडो संविधान बचाव, संविधान अमरे रहेच्या घोषणा यावेळी नर्मदा बचावच्या कार्यकर्त्यांकडुन देण्यात आल्या. तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.