नवापूर l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हात गुजराथ विधानसभा निवडणुकीचा पाश्वभुमीवर अवैद्य दारु साठ्यावर नवापूर पोलिसानी कार्यवाही केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २६ नोव्हेबर २०२२ रोजी पोलिस अधिक्षक पी.आर. पाटील,अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गुप्त माहीती वरुन सायंकाळी ४:३० वाजता नवापूर तालुक्यातील रायपूर गावाजवळील हॉटले डी.एन. डी.व त्यांच्या जवळील ऊसाचा शेतात देशी वेदेशी दारु अवैद्यसाठा एकुन २ लाख ५५ हजार किंमतीचा माल मिळुन आला.
हॉटेल चालक व मालक भाविन रमेश कोकणी रा. रायपूर ता नवापूर याला नवापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक वारे,सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,अ.स इ विकास पाटील,गुमानसिंग पाडवी,नरेंद्र नाईक,योगेश थोरात,प्रेम जाधव,कैलास तावडे,पंकज सुर्यवंशी, तसेच पोलिस मुख्यालयाचे आर सी पी प्लॉटून चे कर्मचारी यांनी केली आहे.