Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कालीबेल येथील मजूराचा संशयास्पद मृत्यू : पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणीसाठी मृतदेह मिठात ठेवला पुरुन

team by team
November 27, 2022
in क्राईम
0
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

नंदूरबार l प्रतिनिधी

ऊस तोड मजुरीसाठी माळशिरस तालुक्यातील तोंडले येथे गेलेल्या कालीबेल (ता. धडगांव) येथील ईश्वर सिपा वळवी यांचा मनमाड येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी तोंडले ता. माळशिरस जि. सोलापूर येथे दोघे व कालीबेल येथील मुकादमाची सखोल चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयताचा भाऊ सागर सिपा वळवी यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह मिठात पुरुन ठेवला असून पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

याबाबत सागर वळवी यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तोंडले गावातील दोघा इसमांनी ऊसतोड कामासाठी कालीबेल (ता.धडगाव) येथून 28 नोव्हेंबरला ईश्वर सिपा वळवी व गावातील काही मजुरांना मुकादमामार्फत घेवून गेले होते. परंतु तोंडले या गावात 20 ते 25 लोकांच्याऐवजी पाच, सहाच मजूर होते.

 

त्यामुळे पाच सहा जणांना ऊस कापणे, ऊसाची मोळी बांधणे, ट्रॅक्टर भरणे शक्य नसल्याने ईश्वर वळवी यांनी अजून काही मजुरांना घेऊन या तेव्हाच काम पूर्ण होतील असे मुकादमांना सांगितले. परंतु मुकादम यांनी मागणी पूर्ण न करता तुम्हालाच पूर्ण काम करावे असे सांगून जबरदस्तीने ऊस तोड करायला लावायचे. ऊसतोड न केल्यामुळे तेथेच ईश्वर वळवी व इतर मजूरांना मारहाण करण्यात आली. शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने ईश्वर वळवी हा घरी येत असतांना मनमाड येथे दि.4 नोव्हेंबरला त्यांना तिघांनी एस.टी.बस मधून जबरदस्तीने उतरवून घेतले.

 

 

त्यावेळी त्यांच्यापासून माझ्या जीवास धोका आहे मला लवकर घ्यायला यावे, असा फोन ईश्वर वळवी यांनी त्यांच्या वडिलांना केला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. दि.5 नोव्हेंबर रोजी सकाळी ईश्वर सिपा वळवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी फोन करून सांगितले.

त्यानुसार कुटुंबियांनी मनमाड गाठले व तेथून कालिबेल येथे मृतदेह आणला. प्रत्यक्ष मृतदेह बघितल्यावर त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा दिसून आल्या. ही आत्महत्या नसून मारहाण करून, गळा दाबून हत्या करण्यात आली आहे, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

 

मयत ईश्वर वळवी यांच्यावर अंत्यविधी न करता त्याचा मृतदेह मिठात पुरून ठेवण्यात आला आहे. जोपर्यंत आरोपीवर कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही. तसे न झाल्यास पुन्हा शव विच्छेदन करण्यात यावे अशी मागणी सागर वळवी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

26/11 हल्ल्यातील शहीदांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे श्रध्दांजली व संविधान दिनानिमित्त उद्देशिका करण्यात आले वाचन

Next Post

ऊसतोड मजूरांची पिकअपचा अपघात ; चिमूरडीचा मृत्यू

Next Post
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

ऊसतोड मजूरांची पिकअपचा अपघात ; चिमूरडीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add