Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘स्मार्ट’ प्रकल्प कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

team by team
November 25, 2022
in राजकीय
0
‘स्मार्ट’ प्रकल्प कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई l

 

 

‘स्मार्ट’ प्रकल्प हा राज्यातील कृषि क्षेत्रासाठी गेम चेंजर असणार आहे. या प्रकल्पादरम्यान विकसित होणाऱ्या लिंकेजेसमुळे शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध होणार आहे. राज्यातील कृषिक्षेत्र वातावरणीय बदलांना अनुकूल करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची आज राजभवन येथे भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिष्टमंडळातील शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप मुजुमदार, झियांग वाँग या सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंपदा विभागाचे सचिव राजन शहा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोक्रा – 2  हा जवळपास  600 मिलियन डॉलर्सच्या गुंतवणूक  प्रकल्पाची  राज्यात  अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली.  कृषि क्षेत्रासाठी राज्यात स्वतंत्र फिडर असून या फिडर्सचे सोलरायझेशन करण्यात येत आहे. कृषि क्षेत्रामध्ये राज्याची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा)  येणाऱ्या गावांमधील देखील कृषि फिडर्स सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न आहे .

राज्यात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या तरुणांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यासाठी कौशल्य विकासाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या  बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. कौशल्य विकास विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या कौशल्य विकासाच्या विविध  योजनांची ‘मित्रा’ या संस्थेशी समन्वयाने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.   वातावरणीय बदलामुळे राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वारंवार पूर येतात, तर काही भागाला अवर्षणाचा सामना करावा लागतो. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुराचे पाणी अवर्षणग्रस्त भागात वळवण्याचा राज्याचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत कृष्णा नदी पात्रातील  पुराचे पाणी भीमा नदीच्या पात्रात  वळवण्याचा विचार आहे. यामुळे भीमा खोऱ्यातील  14 अवर्षणग्रस्त जिल्ह्यांना लाभ होणार आहे.  पुरामुळे कोल्हापूर, सांगली भागातील ऊस लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते, या भागातील कृषि क्षेत्राला ‘स्मार्ट’ प्रकल्पाचा लाभ होऊ शकतो, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषि क्षेत्रावर होणारा परिणाम, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, पोक्रा योजना,जलसंपदा प्रकल्प याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

सोयाबीन-कापसाचा बाजारभाव स्थिर राहण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

अक्कलकुवा गृप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच उषाबाई बोरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Next Post
अक्कलकुवा गृप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच  उषाबाई बोरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

अक्कलकुवा गृप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच उषाबाई बोरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add