नंदुरबार l
नंदुरबार आगारातून नंदुरबार ते वडझाकण सकाळी 8 वाजेची बंद असलेली बसफेरी पुर्ववत सुरु करण्यात यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या मागणीच्या निवेदनाची दखल घेत सदर बसफेरी सुरु करण्याचे आश्वासन यावेळी आगारप्रमुख मनोज पवार यांनी दिले.
याबाबत नंदुरबारचे आगारप्रमुख मनोज पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील वडझाकण गावासाठी नंदुरबार आगारातून दररोज सकाळी 8 वाजता नंदुरबार ते वडझाकण बस सुरु होती. परंतु मागील काही महिन्यांपासुन नंदुरबार ते वडझाकण सकाळी 8 वाजेची बस बंद करण्यात आली असल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यास उशिर होतो. तसेच दुसर्या खाजगी प्रवासी वाहनाने ते वेळेवर पोहचु शकत नाहीत.
गावातून अनेक रहिवाशी नंदुरबार येथे कामाला जातात. तसेच विद्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये जातात. म्हणुन सकाळी 8 वाजेची बस बंद असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशींचे हाल होत आहेत. म्हणुन वडझाकण गावांपर्यंत सकाळी 8 वाजेची नंदुरबार-कोकणीपाडा- वडझाकण अशी बसफेरी पुर्ववत सुरु करण्यात यावी,
अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, नंदुरबार उपतालुकाध्यक्ष विनोद वसावे, उपशहराध्यक्ष संतोष पेंढारकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण जोशी, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष राम ठक्कर, प्रसिध्दीप्रमुख कल्पेश माळी, विलास वळवी, शरद गावित, पराग कोकणी, किरण कोकणी, आशिष रेवा, प्रणित चोधरी, सलावी पवार, सुशिल कोकणी, जयेश कोकणी, मयुर पवार, रजनिकांत कोकणी, रितेश चौरे, कल्पेश गावित, सानिया चौरे, दक्षिणी चौधरी, पुनम राऊत, मितल राऊत, वर्षा वळवी, सुहास चौरे, आर्यन गांगुर्डे, रोहित गांगुर्डे, निखील कोकणी, श्रीकांत कोकणी, सोमनाथ गावित, मंगेश चौधरी, चेतन चौधरी आदींनी निवेदनातून केली आहे.








