नंदूरबार l प्रतिनिधी
येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयातील शै. वर्ष 2022- 23 मधील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. माधव कदम उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून लाभलेत. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम.जे. रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा.
तसेच एकूण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी मोजकेच विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना मध्ये प्रविष्ट होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचा विकास घडवून आणण्याची अनमोल संधी राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिनेश देवरे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयोचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.उपेंद्र धगधगे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. जयश्री नायका व वरिष्ठ स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सुमारे 150 विद्यार्थी उपस्थित होते.