म्हसावद l प्रतिनिधी
शहादा शहरातील मध्ये तरुण मुले दिवसेंदिवस नशेच्या आहारी जात आहेत. नशेच्या उद्देशाने अनेक तरुण मुलं स्वतःची पर्वा न करता कफ सिरप, पेन किलर, व्हाईटनर आणि गांजा घेत आहेत, कारण त्यांच्यापैकी अनेकांना आपण आपल्या आयुष्याचं काय करत आहोत याची जाणीव नाही. या गंभीर विषयावर शहादा शहर पोलीस निरीक्षक आगरकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
पोलीस निरीक्षक आगरकर सो यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत आश्वासन दिले की या विषयाची सखोल चौकशी करून, लवकरात लवकर करवाई करण्यात येईल. हा निवेदन सादर करताना अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष ॲड दानिश पठाण, शहादा तालुका अध्यक्ष माधवराव पाटील, शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष संजय खंदारे, जिल्हा संघटक मिन्हाज मुंशी, शहर उपाध्क्ष गुड्डू सय्यद, समाजसेवक साजिद अन्सारी, महिला शहर अध्यक्ष रेश्माताई पवार, अल्पसंख्यक जिल्हा संघटक जुबेर बागवान, शाहनवाज पहेल्वान आदी हजर होते.