नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर वडवद येथील ग्रुप ग्राम पंचायतच्या सरपंच पदी सौ. शोभाताई प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भालेर येथील सरपंच पदाचा राजीनामा मुळे आज रोजी सरपंच पदाची निवडणूक झाली.सरपंच पदासाठी शोभाबाई प्रल्हाद पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल पानपाटील यांनी काम पाहिले.गटनेते भास्करराव हिरामण पाटील यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार सौ. शोभाताई प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड होण्यासाठी यांनी विशेष सहकार्य केले. सरपंच निवड प्रक्रियेसाठी ग्राम विकास अधिकारी एस. पी. पाटील , तलाठी पवार यांनी सहकार्य केले.
बिनविरोध निवडीसाठी भास्करराव हिरामण पाटील , भिका भाना पाटील , प्रताप आत्माराम आत्माराम पाटील , नाना आत्माराम पाटील , दिनेश विक्रम पाटील , फकिरा गंगाराम पाटील , राहुल पाटील, ॲड. पंकज बागुल , जगदीश पाटील , हर्षल पाटील ,वासुदेव पाटील , सुनील पाटील , दिलीप पाटील , देविदास पाटील यांचे सहकार्य लाभले.