नवापूर | प्रतिनिधी
नवापूर शहरालगत वनविभागाने विना परवाना वाहतूक करण्यात येणारे जळाऊ लाकूड जप्त केले. या लाकडाची किंमत वाहनांसह 5 लाख 70 हजार रुपये आहे.
सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल प्रा. शिवाजी रत्नपारखे, वडकळंबी वनपाल डी.के.जाधव, वनरक्षक तपासणी नाका नवापूरचे कल्पेश अहिरे, करंजी खुर्द वनरक्षक संतोष गायकवाड यांच्या पथकाने गुप्त बातमीवरून संशयित वाहन (क्रमांक MH 26 AD 0103) हे नवापूर शहर हद्दीलगत गुजरातकडे जात असताना अडवले. या वाहनांची तपासणी केली असता सदर वाहनातअवैधरित्या पंचरास जळाऊ मशिनने कटींग केलेल्या लाकडाचा मुद्देमाल विना परवाना आढळून आला. घटनास्थळावरून वाहन चालक फरार झाला. सदर वाहन लाकूड मुद्देमालासह जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला. सदर लाकूड मालाची व वाहनाची एकूण किंमत अंदाजे 5 लाख 70 हजार एवढी आहे. याबाबत वनरक्षक करंजी खुर्द यांनी प्रथम गुन्हा नोंद केला. पुढील कारवाई उपवनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार तसेच वनक्षेत्रपाल नवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनपाल वडकळंबी करीत आहेत.