म्हसावद l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभाग अंतर्गत तळोदा प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धाचे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, शिर्वे ता तळोदा येथे आयोजन करण्यात आले होते.
अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, मांडवा(देवमोगरा पुनर्वसन) ता अक्कलकुवा येथील विद्यार्थ्यांनी या सांघिक खेळ या स्पर्धेत यश संपादन केले आहे.झालेल्या स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये मांडवा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सांघिक खेळामध्ये आपला समावेश नोंदवून विभागीय स्तरीय निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे 17 वर्ष वयोगटातील मुलांचा 1500 मिटर धावणे अश्विन सेगा वसावे , 1 9 वर्ष वयोगटातील मुलांचा कबड्डी स्पर्धेत मनिष जोबल वसावे ,तुषार विक्रम तडवी,19 वर्ष वयोगटातील 3000 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांकाने पोपट पुन्या वसावे, 19 वर्ष वयोगट गोळफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मनिष वसावे या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.सर्व यशस्वी खेळाडू चे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक एम व्ही देसले , प्राथमिक मुख्याध्यापक डी एन गोसावी, अधीक्षक डी ए बेडसे,प्राध्यापक सुभाष एस तडवी,क्रीडा मार्गदर्शक ए. व्ही. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.