नंदुरबार l प्रतिनिधी
शहर आणि जिल्ह्यातील बाजारपेठेत दैनंदिन खाद्यतेलातील भेसळीला प्रतिबंध घालण्याची मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य महेंद्र मंगा चौधरी यांनी केली आहे.
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना दिलेल्या निवेदनात महेंद्र चौधरी यांनी म्हटले आहे की, सध्या नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातील बाजारपेठेत विक्री होणाऱ्या खाद्यतेलामध्ये प्रचंड भेसळ होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याचबरोबर अनेक तेल माफिया विक्रेते याद्वारे आर्थिक दृष्ट्या गब्बर होत आहेत अनेक व्यापारी खाद्यतेलाअनेक व्यापारी खाद्यतेलात पाम तेल व इतर केमिकलचे मिश्रण करीत आहेत यातील विक्रेत्यांकडे कुठलाही साठा नोंद नसून शासनाचा कर देखील बुडवीत आहेत तसेच खोबरेल तेलाचा बनावट साठा गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून आयात करीत आहेत.
यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी जनता आणि इतर नागरिकांची पिळवणूक होत आहे याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने विक्रेत्यांची कसून चौकशी करत तपासणी करावी.ग्राहकांच्या आरोग्याला घातक ठरलेल्या बनावट तेलासंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे तसेच खुलेआम बनावट तेल विक्री करणाऱ्या तेल तस्करांवर जीवनावश्यक कायद्यानुसार कठोर कारवाईचे पाऊल उचलावे अन्यथा अशा व्यापाऱ्यांविरोधात नागरिकांतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात येईल असेही महेंद्र चौधरी यांनी निवेदनातून नमूद केले आहे.
यासंदर्भात निवेदन स्वीकारल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी सकारात्मक चर्चा करून लवकरच अन्न व औषध पुरवठा विभागाला आदेश पारित करणार असल्याचे आश्वासित केले.दरम्यान नंदुरबार येथील खाद्य तेलातील भेसळी वर प्रतिबंध घालण्याबाबतचे निवेदन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या माहितीसाठी देखील मंत्रालयात पाठविण्यात आले आहे.