नंदुरबार l
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनीसाठी वसतीगृह प्रवेशासाठी 30 नोव्हेंबर,2022 पर्यंत मुदतवाढ दिली असून ज्या विद्यार्थींनीनी अद्याप वसतीगृह प्रवेश घेतला नसेल अशा विद्यार्थिंनीनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल सुषमा मोरे यांनी केले आहे.
वसतिगृहात प्रवेश गुणवत्तेनुसार देण्यात येत असून प्रवेशित मुलींना मोफत निवास, भोजन, नाश्ता, स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, सहल खर्च, तसेच दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल. प्रवेश अर्ज मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे मोफत उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (9527505895) वर संपर्क साधावा.