नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून पाच वेळा बिनविरोध मात्र आता सहावी पंचवार्षिक ची निवडणूकीत मतदान होणार १७ पैकी २ बिनविरोध तर १५ जागेसाठी ३ डिसेंबर ला मतदान होणार .सत्ताधारी पक्षाने आ.शिरीषकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनल उभे केले आहे.भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने सत्तेसाठी कंबर कसली असून पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले आहेत.
डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना सत्ताधारी पक्षाने आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनल उभे केले आहे तर भाजपने भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनलने निवडणुकीत कंबर कसली आहे. तर सत्ताधारी पक्षाने व परिवर्तन पॅनल ने आपापली सर्व ताकद लावून सत्ता कायम राहण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. ही निवडणूक प्रतिष्ठितेची झाली आहे.
नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची सहावी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना स्थापन झाल्यापासून पाच पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ही सहावी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे.
कारखान्याच्या १७ जागेसाठी निवडणूक लागली आहे. २७ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी होता. 3 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांवर छाननी झाली. ४ ते १८ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी माघारी घेण्याचा कालावधी होता. १९ नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध झाली.दोन संचालक च्या जागा बिनविरोध झाल्याने आता १५ जागांसाठी मतदान होणार आहे.
३ डिसेंबरला मतदान होणार आहे. ४ डिसेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल ने सतरा तर परिवर्तन पॅनल ने आपले १५ उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत सतरा पैकी अजित नाईक व आरीफभाई बलेसरिया हे दोन उमेदवार बिनविरोध झाल्याने आता पंधरा जागांवर मतदान होणार आहे.
कारखान्याच्या मतदार यादीत ९५५९ सभासद पात्र आहेत. १५ जागेसाठी ९५५९ सभासद मतदानाचा अधिकार प्रथमतः बजावतील. मात्र या मतदारांपैकी काही मयत असू शकतात.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा निबंधक भारती ठाकूर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीरज चौधरी काम पाहत आहेत. या कारखान्याच्या प्रचाराचा नारळ एक दोन दिवसात फुटेल अशी चर्चा सुरू आहे.
निवडणुकीत आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून काँग्रेस पक्षाकडून शेतकरी विकास पॅनल उभा करण्यात आला आहे तर भाजपाच्या वतीने परिवर्तन पॅनल अधिकृत निवडणूक लढवत आहे.
परिवर्तन पॅनल आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिना गावित, माजी आमदार शरद गावीत तर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनल उभे केले आहे. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीत पहिल्यांदा मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या निकालावर पुढील राजकीय गणित स्पष्ट होणार आहे.