नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारकडून गायरान अतिक्रमाणाबाबत नोटीस देऊन अतिक्रमण हटविण्यास मोहिम सुरू आहे. गायरान अतिक्रमणाची मोहीम थांबवूण नियमित करण्यात यावे अन्यथा आदिवासी टाईगर सेना अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून जनआंदोलन करेल असा ईशारा आदिवासी टाईगर सेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र सरकाराकडून गायरान अतिक्रमाणाबाबत नोटीस देऊन अतिक्रमण हटविण्यास मोहिम सुरू आहे महोदय ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला नोटीसा देऊन अचानक घरापासून बेदखल करण्याचे महाराष्ट्रा सरकाराकडून करण्यात येत आहेत. आदीअनादी काळापासून अनेक पिढ्या गाव-पाड्यात वास्तव्य करत आहेत. अचानक सुप्रीम कोर्ट व हाय कोर्ट मुंबई यांच्या निकालाने महाराष्ट्र सरकार गायरान अतिक्रमण मोहीम जोरात कार्य सुरू आहे.

आदिवासी बहूल क्षेत्रात संविधानात २४४/१ अनुसार ५ वी आणि ६ वी अनुसुची लागु केलेली आहे. परंतु आजदेखील अंमल करण्यात आलेली नाही. ५ जानेवारी २०११ सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आदिवासी हा देशाचा मुळ मालक आहे. हेही सांगितले आहे. पेसा क्षेत्रात जल जंगल जमीनीचे संरक्षण करण्याचे अधिकार दिलेले आहेत. परंतू पेसा क्षेत्रात पेसाचे अंमलीकरण करण्यात येत नाहीत. आदिवासी समुदायाची दिशाभुल करून त्यांचे अधिकार हिसकविण्यात येतात.
महसूल विभाग अस्तित्वात येण्याच्या आदीअनादा काळापासून डोंगरदर्यात गावपाड्यात आदिवासी समुदाय जल जंगल जमीनीचे रक्षण करून त्यांचे उदरनिर्वाह करत आहेत. महोदय गायरान अतिक्रमण संदर्भात आपणास विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की, ज्या गावात ७/१२ वर प्रापंचायत सरकार गायरान गुचर अशी नोंद आहे. व अशा ७/१२ वर ज्या लोकांचे घर आहेत. अशा लोकांना तात्काळ नियमित करावी.संविधानात २४४/१ अनुसार ५ वी ६ वी अनुसुची अंमलात आनावी व आदिवासी बहुल क्षेत्राला स्वायतराज मिळवून देण्यास शासन प्रशासनाकडून पाठपूरावा करावा. गायरान अतिक्रमणाची मोहीम थांबवूण नियमित करण्यात यावे अन्यथा आदिवासी टाईगर सेना अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून जनआंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रविंद्र पाडवी, राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावीत, सचिव धनसिंग गावीत, उपाध्यक्ष सुरेश वहवी, निलेश वळवी, दिपक नाईक, विक्रम पावरा, कृष्णा वळवी, लकडया ठाकरे, मुकूंदा वळवी, महेंद्र वळवी, बहादुरसिंग पाडवी, रोशनी राकेश ईशी, अशोक गावीत, अनिल तेले, कैलास मगन वळवी, संतोष शिवदास तेले, रामसिंग किसन वळवी, सुरेश शंका वळवी, अमृत शेख मलवी यांच्या स्वाक्षर्या आहेत.








