नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील वडफळया येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकास मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,धडगांव तालुक्यात वडफळया येथील उमराणी रस्त्यावर आकाशा पावरा यांचा मित्र तुषार भिका पावरा व इतर दोघांची भांडण सुरू असतांना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आकाश पावरा यांना गोपाल पावरा व दिलीप पावरा या दोघांनी काठीने मारहाण करून दुखापत केली.
यामुळे आकाश सरदार पावरा रा.रोषमाळ बु., जेलसिंगपाडा ता.धडगांव याच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात गोपाल आपसिंग पावरा, दिलीप सरादार पावरा दोन्ही रा.वडफळया धडगांव यांच्या विरूध्द भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत वसईकर करीत आहेत.








