तळोदा | प्रतिनिधी
प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ आदिवासी विकास विभाग अंतर्गत तळोदा प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन शासकीय आश्रमशाळा शिर्वे येथे दि.१६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेत पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तलावडी येथील विद्यार्थ्यांनी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही स्पर्धेच्या सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात विशेष कौशल्य दाखविले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धांमध्ये तळोदा तालुक्यातील तलावडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सांघिक तसेच वैयक्तिक खेळांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवून विभागस्तरीय निवड निश्चित केली.
यात विभागस्तरीय निवड झालेले विद्यार्थी १७ वर्षाआतील मुलींचा खो-खो संघ विजयी,
१९ वर्षाआतील मुलींचा खो-खो संघ उपविजयी, १४ वर्षाआतील मुले यात आकाश सिमा ठाकरे, थाळीफेक द्वितीय, १४ वर्षा आतील मुली यात उर्मिला खेमा वळवी, उंच उडी द्वितीय, ज्योती रतन ठाकरे, थाळीफेक प्रथम, ज्योती रतन ठाकरे, गोळाफेक द्वितीय,१७ वर्षाआतील मुले यात इंसान दिलीप पाडवी, तीन हजार मीटर चालणे, प्रथम,
अपिन दिलीप वळवी, तीन हजार मीटर चालणे, द्वितीय, १७ वर्षाआतील मुली यात मिनाक्षी जान्या वळवी, आठशे मीटर, प्रथम, मिनाक्षी जान्या वळवी चारशे मीटर, व्दितीय, उषाबाई दिलीप पाडवी तीन हजार मीटर चालणे, व्दितीय, रविना करमसिंग तडवी, उंच उडी, द्वितीय, मिनाक्षी जान्या वळवी
थाळीफेक, प्रथम, १९ वर्षाआतील मुले शनिष मोतीराम पाडवी, तीन हजार मीटर चालणे, प्रथम, मनोज भरत तडवी, तीन हजार मीटर चालणे, द्वितीय, रशा वाड्या वसावे, तीन हजार मीटर चालणे अशा प्रकारे दहा सांघिक आणि चौदा वैयक्तिक क्रीडा प्रकारात एकूण १९ खेळाडू मुले आणि मुलींची विभागीय क्रीडा स्पर्धसाठी निवड झाली आहे.
या सर्व स्पर्धेच्या आयोजनात प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, स.प्र.अधिकारी नंदकुमार साबळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.आर.मुंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी डी.जी.अखडमल यांनी मार्गदर्शन व संयोजन केले. या क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर यांनी विशेष कौतुक केले. तसेच या सर्व यशस्वी खेळाडूंचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजीवन पवार, अधीक्षक पी.आर.वसावे यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक अमोल पाटील, दिलीप पाटील, श्रीमती बबिता गावित, श्रीमती काश्मिरा पाटील, श्रीमती धनश्री आजगे, साईनाथ वळवी, दशरथ पाडवी, श्रीमती नीता पावरा, श्रीमती अलका तिडके आदींनी परिश्रम घेतले.








