शहादा l प्रतिनिधी
हिंदू धर्मशास्त्रात मंदिराचे सर्वाधिक महत्त्व आहे. मंदिराच्या भूमिपूजनानंतर शास्त्र पुराणात मंदिरातील प्रथम शिलेचे पूजन हि महत्त्वाची बाब असून आज पृथ्वीतलावरील हे अत्यंत महत्त्वाचे श्री. विष्णुपुराण मंदिर असणार असल्याची माहिती श्री.नारायण सेवाभावी भक्ती पंथाचे स्वामी लोकेशानंद महाराज यांनी दिली.
स्वामी लोकेशानांद महाराज यांच्या हस्ते आज लोणखेडा येथील विष्णुपुरम येथे मंदिराच्या प्रथम शिलेचे पूजन शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाले यावेळी मध्य प्रदेशाचे कृषिमंत्री कमल पटेल ,खासदार रक्षा खडसे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन दीपक पाटील एडवोकेट ललिता पाटील माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील हेमलता शितोळे याच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोपचारात भक्तिमय वातावरणात प्रथम शिला पूजनानंतर स्वामी लोकेशानद महाराज म्हणाले की श्री नारायण पुरम तीर्थ मंदिर हे पृथ्वीतलावरील भव्य तीर्थक्षेत्र असणार आहे या ठिकाणी अष्ट धातुने निर्मित श्री विष्णू नारायण भगवान यांची २१ टन वजनाची मूर्ती विराजमान होणार असून या मंदिराची नोंद गिनीज बुक मध्ये केली जाणार आहे जगातील हे एकमेव श्री विष्णू स्वरूप मंदिर असल्याने भविष्यात या ठिकाणी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी मंदिराची पायाभरणी करण्यात आली आज आपण मंदिर निर्मितीची प्रथम शिलेचे पूजन केले आहे व येत्या काही दिवसातच या मंदिराचे काम पूर्ण होणार आहे श्री विष्णू नारायण भगवान यांच्या प्रतिमा निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे या परिसरात १८ नोव्हेंबर पासून अमृत भक्ती सत्संग महोत्सव सुरू असून त्याची सांगता २४ नोव्हेंबरला होणार आहे परिसरातील भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री नारायण भक्ती पंथाचे संतकुमारी निकितादिदी, शांतीलाल पाटील, जगदीश पाटील, धनराज पाटील, योगीराज जाधव, गुड्डू पाटील, पप्पूभैया चौधरी, मनिलाल पाटील, इंजी. जितेंद्र पाटील, विश्वजित शिरसागर, डॉक्टर प्रफुल पाटील, मणीभाई पटेल, अशोक पाटील यांनी परिश्रम घेतले.








