नवापूर l प्रतिनिधी

नवापुर तालुक्यातील चरणमाळ घाटातील वळणावर
कांद्यानी भरलेला आयशरचा उलटल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला असून सहचालक गंभीर जखमी झाला आहे.

नवापुर तालुक्यातील चरणमाळ घाटात अपघात होने काय नवीन नाही. काल रात्री १२ वाजेच्या च्या सुमारास पुन्हा एकदा कादे भरलेल्या आयशरचा ( जी.जे.२३, एक्स.६२६२) वळणावर अपघात झाला.या अपघातात आयशर उलटल्याने सहचालक बाहेर फेकला गेला. परंतु चालक हा केबीन मध्ये अडकल्याने त्याचा पाय अडकून प्रकाशभाई रमनभाई ठाकर (५५) यांचा जागीच मृत्यू झाला.सहचालक रतीलाल दुळाभाई वागले (वय 40) हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरझर गावाचे पोलिस पाटील यांनी नवापुर पोलिस ठाण्यात संपर्क करुन अपघाताची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी खाजगी जीवनधारा रुग्णवाहिकेला संपर्क करीत अपघाताची माहिती दिली. कसलाही विलंब न करता खाजगी जीवनधारा रुग्णवाहिकेसह लाजरस गावीत व एलेक्स गावीतता त्काळ अपघात स्थळी पोहचली. आयसर उलटल्याने नवापुर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री.मोकळे यांना माहिती पोलिस पाटील यांनी दिली होती.
त्यांनी क्रेन पाठवत कर्मचाऱ्यांसह अपघात स्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने आयशर व्यवस्थीत करून सहचालकाला बाहेर काढून खाजगी जीवनधारा रूग्णवाहिकेत नवापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले . सहचालक यांचा पाय पुर्ण दाबला गेल्यांने पुढील उपचारासाठी त्याला नंदुरबार येथे दाखल केले आहे.









