नंदुरबार l

तालुक्यातील काळंबा येथे शेती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन हाताबुक्यांनी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील काळंबा येथील नथ्थू डोंगऱ्या चौरे यांच्या मालकीची शेती राजू शिवराम भोये यांनी मागितली. नथ्थू चौरे यांनी शेती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन राजू शिवराम भोये, रामसिंग शिवराम भोये व कैलास रामसिंग भोये यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच रामसिंग भोये याने कुऱ्हाडीने दांनड्याने खांद्यावर, हातावर मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत नथ्थू चौरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. मुकेश ठाकरे करीत आहेत.









