नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील लालबारी गावाजवळील रेल्वे रुळाजवळ बी.सी.वस्तीगृहातील विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर शहरातील लालबारी गावाजवळील रेल्वे रुळावरील पोल क्रमांक १२५ व पोल क्रमांक १२६ दरम्यान एका अज्ञात युवकाचा रेल्वेच्या धडकेत जखमी होऊन रुळावर पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला या मृतदेहाची ओळख पटू शकली नसल्याने पोलिसांनी सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचा आवाहन केले होते.
आज १७ नोव्हेंबर २०२२ रोजी नवापूर पोलिसांच्या तपासात त्या युवकाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.लालबारी येथील बी.सी.वस्तीगृहात वास्तव्यास असलेला दीपक सखाराम गावित या विद्यार्थ्याचा मृतदेह असल्याचा निष्पन्न झाला आहे.सदर मयत विद्यार्थी हा नवापूर तालुक्यातील उचिशेवडी गावाचा रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली.
दिपकच्या मृत्यू मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.नवापूर पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विकास पाटील, युवराज परदेशी पुढील तपास करीत आहे