नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा परिसरातील अनरद येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय, शहादा (नंदुरबार) येथील कृषिदुतांचे आगमन झाले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती, माती, पाणी परीक्षण, कीड व रोग यांचे एकित्रत व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन आणि शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे विश्लेषण या कृषिदूतांकडून करण्यात येणार आहे.
कृषिदूत कपिल पाटील,लोकेश पाटील,निखिल पवार, वैभव पाटील, दिपक पाटील ,रोहित गवळे हे विद्यार्थी अनरद गावात राहून पुढील दहा आठवडे पदवी अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी अनरद गावच्या सरपंच श्रीमती कविता पाटील, उपसरपंच लीलाबाई गिरासे,ग्रामसेवक योगिता न्हावी , तलाठी कल्पना गिरासे, पोलिस पाटील दिनेश पाटील, किरण पाटील, पुरुषोत्तम निकम, मनोज वाघ, अनिल वाघ, सदानंद वाघ, वसंत पाटील आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल, कार्यक्रम अधिकारी प्रा. सी. यू. पाटील व कार्यक्रम समन्वयक प्रा. विजय गावंडे यांनी मार्गदर्शन केले.