नंदूरबार l प्रतिनिधी
कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रातील आय.एस.ए.पी संस्थेतर्फे उपजिविका व समाजिक सुरक्षा योजना कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हातील बचत गटातील एकूण 105 महिलांनी सहभाग घेतला.
इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रीबिजनेस प्रोफेशनल्स, न्यू दिल्ली व स्कोल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपजीविका व समाजिक सुरक्षा योजनाची एकदिवशीय कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्र,कोळदा येथे अयोजित करण्यात आली.या यावेळी उपस्थित महिला यांना उद्योग व्यवसायाच्या संधी व शासकीय योजनांची माहिती देत, मान्यवरांच्या हस्ते सहभागीतेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन जिल्हा नोडल अधिकारी विजय मोहिते , PMFME कृषि विभाग,नंदुरबार , प्रा. निलेश गायकवाड ,तसेच मावीमचे अधिकारी सौ.कांतागौरी बनकर ,के व्ही के तर्फे सौ.आरती देशमुख, तसेच प्रकल्प स्कोल चे समन्वयक सौम्या शुक्ला व शिवानी नेगी हे उपस्थित होते. यासाठी जिल्हा समन्वयक बाळासाहेब घुले, तालुका समन्वक विशाल घरटे ,हरीष मोरे, गिरीष बावा, निकिता टेकाळे तसेच प्रकल्पातील गाव स्वयंसेवक अनिता गोसावी, सविता पाटील ,रोहिनी पाटील ,रुपाली धनगर, मोनिका महाले, मोक्षदा बावा ,छाया पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.








