म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे तोरणमाळ रस्त्यावर रिद्धी सिद्धी गणपतीच्या ऊत्तरेला वळणावर रस्त्याच्या बाजूला एका खोलचारीत मोटरसायकलसह कुजलेले प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलीस तपासात सदर कुजलेले प्रेत इस्लामपूर तालुका शहादा येथील युवकाचे असल्याची माहिती म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दिली.
म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावर रिद्धी सिद्धी गणपती मंदिराच्या काही अंतरावर रस्त्याला लागून एक मोठी कवटी रस्त्यावर होती.त्या कवटीची दुर्गंधी पसरत होती. याबाबत म्हसावद महिला दक्षता समिती अध्यक्षा यानी ज्येष्ठ पत्रकारास सांगीतले.त्यांनी पोलिसांची संपर्क साधून त्या संदर्भात माहिती दिली.पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी जाऊन पाहणी केली.रस्त्याच्या आजूबाजूला शोधाशोध केली.
नेमकी माणूस जातीची कवटी आली कुठून हा प्रश्न भेडसावत होता.रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर खोलचारीत मोटरसायकल (क्र. एम.एच.३९एल.२४८१) सह एका युवकाचे कुजलेल्या स्थितीत प्रेत मिळून आले.त्याचीच कुजलेल्या स्थितीत असलेली कवटी एखाद्या प्राण्याने ओढून नेली असेल असे निष्पन्न झाले.कुजलेल्या प्रेताच्या जे कपडे होते त्यात मोबाईल देखील आढळून आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.म्हसावद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ए.आर. शेख यांनी घटनास्थळी प्रेताची पाहणी केली.प्रेत शवविच्छेदन साठी पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात नेले आहे.
दि. 24 ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथील कोतवाल युवक विनोद जेठ्या पावरा हा हरवल्याची तक्रार म्हसावद पोलिसात दाखल होती.त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून पोलीस स्टेशनला बोलवले जाईल.24 दिवस झाल्याने प्रेत पूर्णतः कुजले आहे.रस्त्याच्या बाजूला खोलचारी व काटेरी झुडपे असल्याने दिसून आला नाही. म्हसावद पोलिसात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
एकंदरीत कवटी रस्त्यावर बाजूला पडलेली दिसून आल्याने जागृतीमुळे प्रकरणाच्या उलगडा झाला आहे.पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी शोधाशोध केल्याने हा सारा प्रकार तपास कामात निष्पन्न झाला.घटनेच्या पुढील तपास म्हसावद पोलीस करीत आहेत.








