नवापूर l प्रतिनिधी
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला समर्थन करण्यासाठी नवापूर शहरातून काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय युवक कॉग्रेस तर्फे भारत जोडो यात्रेनिमित्त जनजागृती व समर्थन बाईक रँलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीचा शुभारंभ नवापूर शहरातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथुन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.बाईक रॅली साईमंदीर रोड,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन बाईक रॅली लाईट बाजार ,महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन शितल सोसायटी,शिवाजी रोड,राम मंदीर गल्ली,सरदार चौक,बसस्थानक परिसर फिरुन बाईक रँलीचा समारोपन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे करण्यात आले.बाईक रॅली मध्ये नफरत छोडो भारत जोडो,मिले कदम जुडे वतन अशा घोषना रॅलीत देण्यात आल्या.
यावेळी माजी जि.प अध्यक्ष रजनी नाईक,माजी जि.प. सदस्य अजित नाईक,पं.स सभापती बबीता गावीत,नगराध्यक्ष हेमलता पाटील,तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,डॉ नचिकेत नाईक,शहर अध्यक्ष सोहेल बलेसरीया,गटनेता आशिष मावची,नगरसेवक आरीफ बलेसरीया,हारुन खाटीक,नगरसेनिका बबीता वसावे,मंगला सैन,माजी उपनगराध्यक्ष फारुक शहा,माजी नगरसेवक अजय पाटील,उमराण ग्रामविकास संस्था सचिव दिपक वसावे,सुभाष कुंभार,विधानसभा क्षेञ अध्यक्ष पराग नाईक,युवक जिल्हा सरचिटणीस देवा कोकणी,तालुका युवक उपाध्यक्ष अश्विन वसावे,सिमोन गावीत ,सुरज गावीत,शरद मावची,नरेंद्र गावीत,योगेश मावची,फैजल शेख,युवक जिल्हा उपाध्यक्ष रोशन गावीत आदी उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार शिरीषकुमार नाईक यांनी भारत जोडो याञे संदर्भात मार्गदर्शन केले ते म्हणाले की राहुल गांधीच्या भारत छोडो यात्रेला समर्थन करण्यासाठी नवापूर शहरातून काँग्रेस पक्षातर्फे बाईक रॅली करण्यात आली याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेस पक्षाच्या सूचनेनुसार आम्ही शहरात व खेडोपाडी या यात्रेच्या समर्थनार्थ रेली काढली आहे. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यात्रे संदर्भात लोकांमध्ये जाऊन त्याची माहिती देऊन जनजागृती केली पाहिजे. नवापूर तालुक्यातील लोकांनी भारत छोडोला समर्थन दिले आहे.यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक अशोक मोकळ यांनी चोख बदोबस्त ठेवला होता.








