नंदुरबार l प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान संचलित निझर सेवा केंद्रातर्फे निझर( गुजरात) येथे भव्य प्रदर्शन देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.नवदुर्गा दर्शनासह बारा ज्योतिर्लिंग देखावा लक्षवेधी ठरला असून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गुजरात राज्यातील निझर येथील संगीता नगर, अंबाजी मंदिरा समोर भव्य प्रांगणात प्रदर्शनाचे उद्घाटन तापी जिल्हा प्रभारी तथा शहादा तळोदा विभागाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाले. विश्व कल्याणासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे कार्यअलौकिक असल्याचे प्रतिपादनआमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी प्रदर्शनाला भेट देऊन नंदुरबारला देखील याचप्रमाणे भव्य प्रदर्शन भरवण्याचा मानस व्यक्त केला .दि. 20 नोव्हेंबर पर्यंत दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रदर्शनी भाविकांसाठी खुली राहणार आहे.प्रदर्शनी मध्ये भव्य प्रकाश व ध्वनी व्यवस्था सुसज्ज असून चाळीस फूट उंच भव्य चैतन्यदायी देवींचा देखावा सादर करण्यात आला आहे. यात बारा ज्योतिर्लिंग दर्शनासह अध्यात्मिक लाईट व साऊंडद्वारे परमात्मा अवतरण देखावा,
भव्य ब्रह्मांड, आकाश, पाताळ आणि पृथ्वी अशा तिन्ही लोकांचे दर्शन प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण करण्यात येत आहे. तसेच व्यसन मुक्तीवर प्रभावी पथनाट्य लक्षवेधी ठरले आहे.येत्या 20 नोव्हेंबर पआहेंत भाविकांनी या भव्य प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन निझर केंद्राच्या संचालिका कमलदीदी आणि नंदूभाई तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयओम शांती परिवारातर्फे करण्यात आले आहे.प्रदर्शन संयोजनासाठी नंदुरबार आणि खापर सेवा केंद्राचे सहकार्य लाभले आहे.








