नंदुरबार l
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगीचा चनवाईपाडा येथे ॲपेरिक्षाने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला. यात वाहन व ॲपेरिक्षातील लोकांना दुखापत झाली असून ॲपेरिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील शिवाजी तापसिंग पाडवी हे त्यांच्या मालकीच्या चारचाकी वाहनाने (एम.एच.४१ सी ०२३३) चालक मस्जिद अहमद शेख याच्यासोबत मोलगी येथून बाजार करुन परत घरी काठी येथे जात होते.
यावेळी लालसिंग सरवरसिंग पाडवी (रा.भांग्रापाणी ता.अक्कलकुवा) याने त्याच्या ताब्यातील ॲपेरिक्षा (क्र.जी.जे.१५ एक्सएक्स ९०८३) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन समोरुन येणाऱ्या एका ॲपेरिक्षा ओव्हरटेक करीत असतांना ॲपेरिक्षा उलटून लालसिंग पाडवी हा चारचाकी वाहनाच्या बोनेटवर जाऊन आदळला. या अपघातात वाहन व ॲपेरिक्षातील लोकांना दुखापत झाली. अपघातानंतर ॲपेरिक्षा चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत शिवाजी पाडवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात लालसिंग पाडवी याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.आधार सोनवणे करीत आहेत.








