नंदुरबार l
धडगाव तालुक्यातील देवबारा घाटात पिकअप वाहन उलटल्याने चालकासह काही प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील कासिफ सलीम शेख हा त्याच्या ताब्यातील पिकअप वाहनात (एम.एच.४८ टी-७१९७) प्रवासी घेवून देवबारा घाटातून उतरत असतांना वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यात वाहन चालक कासिफ शेख याच्यासह काही प्रवाशांना दुखापत झाली.
याबाबत शकील शरफोद्दीन मन्यार यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात कासिफ शेख याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.स्वप्नील गोसावी करीत आहेत.








