नंदुरबार l
समाज सेवेचे अखंड समाजहितोपयोगी उपक्रम राबविणार्या रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड येथील डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत महाराष्ट्र भुषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित तसेच पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व डॉ.श्री.सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्हा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

आपल्या समर्थ कार्यातून तमाम तरुणाईसमोर कृतीयुक्त आणि वैचारिक आदर्श उभा करणार्या प्रतिष्ठानमार्फत वर्षभर विविध उपक्रम वृक्ष लागवड व संवर्धन, रक्तदान शिबीर, जलपुनर्भरण राबविण्यात येत आहे. नंदुरबार, भालेर, सारंगखेडा, शहादा, तळोदा, दोंडाईचा, खेतिया(मध्यप्रदेश) व सोनगढ (गुजरात) येथे अशा ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रविवारी ४२१ श्रीसदस्यांनी अवघ्या अडीच तासात ३९ टन कचरा गोळा केला.

जिल्ह्यात एकुण १४ किलोमीटर अंतर परिसरात स्वच्छता मोहीम पार पडली. श्री समर्थ बैठकीतील शेकडो श्रीसदस्यांनी अभियानात सहभाग घेतला. स्वयंशिस्त व उत्तम नियोजनामुळे स्वछता अभियान यशस्वी होत आहे. पिण्याचे पाणी, मास्क व हातमोज्यांची व्यवस्था प्रतिष्ठानकडून होत आहे. श्रीसदस्यांनी खराटे, दाताळे, घमेली, खोरे, झाडू आवश्यक स्वच्छतेचे साहित्य स्वतः आणुन स्वच्छता अभियान निरपेक्ष भावनेतून करत आहे.
माणुसकीचा पाया बळकट
डॉ.श्री.नानासाहेब, डॉ.श्री.आप्पासाहेब, डॉ.श्री.सचिन दादा यांनी देशानं काय दिलं यापेक्षा मी देशाला काय दिले? हा सवाल समाजाला केला आणि ठिकठिकाणी समर्थ बैठीकींच्या माध्यमातून देशाला उत्तम विचार देणारा, देशसेवा करणारा समाज घडवून दाखवला. श्रवण-मनन-निजध्यास ह्या त्रिसूत्रीच्या माध्यमातून गेली ७९ वर्षे हि शिकवण जनमानसात रुजवतांनाच मनुष्य हि जात आणि माणुसकी हा धर्महा माणुसकीचा पाया रचला, बळकट केला.








