नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर येथे देवगिरी कल्याण आश्रम व बिरसा मुंडा उत्सव समिती कडून भगवान बिरसा मुंडा जयंती व राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात आला.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन व क्रांतीविर बिरसामुडा यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपाचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी केले.
यावेळी नगरसेवक गिरीष गावीत, जनजाती सुरक्षा मंच अखिल भारतीय सदस्य डॉ विशाल वळवी,
बिरसा मुंडा उत्सव समिती अध्यक्ष जैनु गावीत,नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी,पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,अजय गावीत, अशोक पाडवी, मनोज मावची श्यामभाई गावीत, अशोक गावीत, गुलाबीसिंग वसावे रशीद गावीत, भरत होण्या गावीत, ईनेश गावीत दर्शन पाटील , राकेश सोनार , श्यामभाई गावीत ,किरण टिभे आदीनी केले.
या नंतर क्रांतीविर बिरसामुडा यांच्या रथाला झेडी भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी देऊन शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली.यावेळी वनवासी उत्कृष समिती प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व महिला व पुरुष सहभागी झाले होते.शोभायात्रा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा पासुन शोभायात्रेला सुरुवात करुन शोभायात्रा लाईट बाजार,गांधी पुतळ्या परीसर फिरुन हनुमान मंदीर येथे सांगता करण्यात आले.









