Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस भरतीतील अटी शिथिल करण्यात याव्यात, आम आदमी शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

team by team
November 16, 2022
in राजकीय
0
पोलीस भरतीतील अटी शिथिल करण्यात याव्यात, आम आदमी शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

नंदुरबार-

 

पोलीस भरती प्रक्रिया-२०२२ मधील उमेदवाराला कोणत्याही एका जिल्ह्यासाठी अर्ज भरण्याच्या अटी शिथिल करण्यात यावी. याप्रकरणी गृह विभागाने गांभीर्याने विचार करुन तात्काळ निर्णय घेवून पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आम आदमी शेतकरी संघटनेकडून भरती प्रक्रिया सुधारणासाठी महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम आदमी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यालयास ई-मेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

 

 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच वर्षापासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यात कोरोना महामारी असो किंवा शासनाच्या उदासिन धोरणामुळे पोलीस उशिरा का होईना पण राज्य शासनाने सुरु केल्या. परंतू त्यातही आता पोलीस भरती राबविताना कुठल्याही एकाच जिल्ह्यात भरतीसाठी अर्ज करता येईल, या अटीमुळे ग्रामीण भागातील वर्षानुवर्षे मेहनत करणार्‍या व पोलीस होण्याचे स्वप्न बाळणार्‍या उमेदवारांवर एकप्रकारे राज्य शासनाने अन्याय केला असून ग्रामीण भागातील बहुतांश तरुण हा अल्पभूधारक किंवा भूमीहीन शेतकर्‍यांचा पोरगा असून एकाच जिल्ह्याची अट राज्य शासनाने घालून दिली असून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर एकप्रकारे अन्याय केला आहे,

 

 

 

 

अशी मानसिकता आज पोलीस भरतीसाठी मेहनत करणार्‍या महाराष्ट्रातील तरुणांची झाली असून राज्यात पोलीस शिपाई पदाचा १८ हजार जागांसाठी ही प्रक्रिया सुरु असून त्यातील बहुतांश जागा मोठ्या शहरांसाठी भरल्या जाणार आहेत. त्यामुळे परिक्षार्थींमध्यणे संंभ्रमावस्था निर्माण होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी तयार होणार्‍या तरुणांची ईच्छेनुसार पोलीस भरती प्रक्रिया ही जुन्या परीक्षा पद्धतीने म्हणजेच  जिल्हा पोलीस किंवा आयुक्तालयासाठी एकापेक्षा अधिक अर्ज करण्याची मुभा राज्य शासनाने द्यावी.

 

 

 

 

पोलीस भरती प्रक्रियेत लागणारे शुल्क जर परिक्षार्थी भरण्यास तयार आहेत, तर राज्य शासनाने परिक्षार्थ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार का करु नये? भरती एकाच जिल्ह्यात एका चुकीने संधी हुकली तर उमेदवाराला दुसर्‍या जिल्ह्यात प्रयत्न करता येतो. एका जिल्ह्यात अपयश आले तर त्या विद्यार्थ्याला दुसर्‍या भरती प्रक्रियेची वाट पहावी लागेल. या काळात वयाची मर्यादा ओलांडली तर उमेदवाराच्या आयुष्याचे कायमचे नुकसान होईल. त्यामुळे मा.मंत्री महोदयांनी भरती प्रक्रियेतील एका जिल्ह्याची अट शिथिल करुन उमेदवारांना जुन्या भरती प्रक्रियेप्रमाणे इतर जिल्ह्यातही अर्ज सादर करण्यासाठी मुभा द्यावी.

 

 

 

 

तसेच भरती प्रक्रियेत बँण्ड पथकाच्या भरती प्रक्रियेचाही समावेश करुन इतर तरुणांनाही संधी द्यावी. वरील विषयावर गृह विभागाने गांभीर्याने विचार करुन तात्काळ निर्णय घेवून पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आम आदमी शेतकरी संघटनेकडून भरती प्रक्रिया सुधारणासाठी महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे आम आदमी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

 भिल प्रदेश ब्रिग्रेड तर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

Next Post

संत निरंकारी मंडळाचे साधक सत्संगासाठी दिल्लीला रवाना

Next Post
संत निरंकारी मंडळाचे साधक सत्संगासाठी दिल्लीला रवाना

संत निरंकारी मंडळाचे साधक सत्संगासाठी दिल्लीला रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add