नंदुरबार येथे भिल प्रदेश ब्रिग्रेड तर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.
भिल प्रदेश ब्रिगेड तर्फे आज भगवान बिरसा मुंडा यांची जन्म जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भिल प्रदेश ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित तडवी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भिल प्रदेश ब्रिग्रेडचे राष्ट्रीय महासचिव बंटी नेतलेकर, महाराष्ट्र राज्य प्रभारी कांतीलाल जाधव, जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी राजेश वळवी, कृष्णा वळवी, रेवदास वळवी ,सुभाष वळवी, श्रीराम वळवी, सावन पवार, राकेश ठाकरे ,जगन वसावे, सुभाष नेरकर आदी उपस्थित होते .यावेळी भील प्रदेश ब्रिग्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित तडवी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा दिला.








