नंदुरबार l प्रतिनिधी
आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये विविध प्रकारचे गुण दडलेले आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. तसेच त्यांच्या मधील असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. या माध्यमातून चांगले खेळाडू घडविण्यात मदत होईल असे प्रतिपादन खा. डॉ. हिना गावित यांनी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित या होत्या.यावेळी आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, राजश्री वळवी, प्रकल्प अधिकारी मीनल करणवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा प्रतिमेचे विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
तसेच क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन खा. गावित यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन झाल्यानंतर हवेत तिरंगा कलर चे फुगे सोडण्यात आले.
यावेळी खा.डॉ.हिना गावित म्हणाल्या आपल्या भागातील विद्यार्थ्यांना खेळाची आवड आहे विविध ठिकाणी खेळामध्ये आपल्याकडील विद्यार्थी नावलौकिक मिळवीत आहेत. मात्र त्यांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे या स्पर्धांमुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवना बद्दल माहिती दिली.

यावेळी अध्यक्षा सुप्रिया गावित यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या बद्दल माहिती दिली स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी ढोंसाकळी, खडकी, पाटलीपाडा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हँडबॉल आणि हॉलीबॉल या दोन स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.एल.काकडे, एस. एस.पटेल, राहुल पवार, एस.एम.चौधरी, के.एस.मोरे, एन. आर. माळी, किशोर गोसावी, डी.एच.माळी, एस. आर. पाटील, व्ही.व्ही.सोनार, आर.एन.निकम यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता एंडाईत यांनी केले तर प्रास्ताविक एस.एस.पटेल यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.








