Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साखरपुडा करून घरी जाताना दोन वाहनांची समोरासमोर धडक,15 जण जखमी

team by team
November 14, 2022
in क्राईम
0
साखरपुडा करून घरी जाताना दोन वाहनांची समोरासमोर धडक,15 जण जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील प्रतापपूर नजीक दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघातात 15 जण जखमी झले आहेत. सूरतहून साखरपुडा करून मालेगावला जात असताना अपघात झाला आहे.

नवापूर तालुक्यातील प्रतापपूर नजीक दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे.या अपघातात एकूण 15 प्रवासी जखमी झाले असून यातील दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व अपघातग्रस्त मालेगाव तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात रात्री प्राथमिक उपचार करून प्रवासी मालेगावला रवाना झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील प्रतापपूर गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे. यात क्रुझर वाहनातील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. सूरतहून साखरपुडा करून मालेगावला जात असताना अपघात झाला आहे. जखमीना खाजगी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात पोहोचवण्यात आले अपघात होताच दोन्ही चालक फरार झाले आहेत. गाडी (क्र.जी. जे. 05 जे.बी.b6025) व क्रुझर गाडी (क्र. एम.एच.15 ई.पी 6864) जोरदार धडक झाली. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री अपघात झाल्याने प्रतापपूर येथील अंकेश गावित, सुनिल गावीत, विशाल गावीत युवकानी अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून आले.

अपघातात जखमी झालेले प्रवासी
रिता लालजी पामरे वय 20 (गंभीर जखमी), लिलाबाई तानाजी पाटील वय 45 (गंभीर जखमी), भगवान बबन फासगे वय 32 , राणी दिपक रागफासरे वय 30 , केशव प्रताप रागफासरे वय 30, बबलू भिमराव देवरे वय 22 , विष्णू मारती रागफासरे वय 42, दिपक कुमाजी रागफासरे वय 35 , मनीषा तुकाराम रागफासरे वय 60, सुखदेव नामदेव रागफासरे वय 46 , छाया सुखदेव रागफासरे वय 42, रोहिणी तानाजी पामरे वय 19
नानाजी भिका पामरे वय 56 सर्व रा. चंदनपुरी, पाथरे,मालेगाव तालुक्यातील आहे.
नबाबाई बबन फासगे वय 76 रा चाळीसगाव जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त सर्व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील आहे एकाच कुटुंबातील व्यक्ती अपघातात जखमी झाले आहेत दोन महिला गंभीर असून इतर 13 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. यासंदर्भात नवापूर पोलीस पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

परमेश्वराच्या नामस्मरणाने जीवन सार्थक होते-  उज्वल जोशी

Next Post

नंदूरबार पालिकेच्या इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून सभेत गदारोळ

Next Post
नंदूरबार पालिकेच्या इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून सभेत गदारोळ

नंदूरबार पालिकेच्या इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून सभेत गदारोळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add